ताज्या घडामोडीपिंपरी
वाकडमध्ये उद्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा भव्य सामूहिक आरती सोहळा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा दि.२२ जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे सर्व देशभर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी वाकड गाव तसेच परिसरातील सर्व सोसायटी मधील सर्व नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या पुढाकाराने वाकडमध्ये उद्या दि.२२ रोजी सकाळी ६ वाजता प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा भव्य सामूहिक आरती सोहळा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे युवानेते राम वाकडकर यांनी दिली आहे.













