वर्धापनदिनी शरदचंद्र पवार यांना भेटून पत्राद्वारे दिल्या विशेष शुभेच्छा

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पुणे येथे भेट घेतली.
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात यशस्वी ठसा उमटवत समाजाच्या प्रत्येक घटकाकडे आस्थेने दृष्टी ठेवून प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला पुन्हा नवसंजीवनी दिली आणि १० पैकी ८ खासदार जिंकून पक्षाला पुन्हा उभारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी आज पुणे येथे शरदचंद्र पवार यांना भेटून विशेष पत्राद्वारे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आशिर्वाद घेतले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष राजेश माने, युवकचे सुरज देशमाने, शहर उपाध्यक्ष काशिनाथ जगताप उपस्थित होते.
पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यश खेचून आणल्याबद्दल आणि वर्धापन दिनानिमित्त विशेष पत्र लिहिले आहे ते पत्र आज सुपूर्द करण्यात आले. पत्रातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे साहेब…. आज आपण आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत आहात, ज्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होते ते जवळचे अनेक सहकारी सोडून गेले पक्ष अडचणीत आला असताना एकनिष्ठ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून पक्षाचे काम निष्ठेने पुढे जाते आहे . याही कठीण काळातून पुढे जाऊ असा आशावाद देत पुन्हा विश्व निर्माण करण्याची जिद्द सर्वानां दिली , स्वकीयासह परकीयाचे हल्ले परतवून लावत प्रसार माध्यमांच्या
प्रश्नांना समोर येऊन उत्तर देत म्हणालात की महाराष्ट्राचा आश्वासन चेहरा कोण.? त्याला तेवढ्याच हसतमुखाने निर्धाराने म्हनालात… शरद पवार .
बस्स..इथेच महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनगटात तुम्ही ताकद दिलीत. वयाच्या ८४ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा प्रकारची हिम्मत आणि ताकद निवडणुकीच्या कालावधीमध्ये दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी अविश्रांत न थांबता भटकंती करत यश खेचून आणलेत . परिस्थितीशी कसं लढावं याचं ज्वलंत उदाहरण तुमच्यापेक्षा दुसरं काहीच असू शकत नाही .साहेब …आमच्या पुढील कार्यास असेच बळ देत रहा तुमच्या एका शब्दाने आमची छाती पोलादी होऊन,लढण्याचे सामर्थ्य मिळत रहाते, जनसामान्यांचा आवाज दिल्लीत पोहोचवणाऱ्या आपल्या आठही निष्ठावान शिलेदार महाराष्ट्रातील जनतेचा स्वाभिमान बाळगणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सुमारे २५ वा आरोप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करत असताना चांद्यापासून ,बांद्यापर्यंत, शेतकऱ्यापासून ते कष्टकरी कामगारापर्यंत हा पक्ष लोकाभिमुख होतो आहे… साहेब तुमची प्रेरणा,मार्गदर्शना आविरत भेटण्याची अंगीकृत करण्याची शक्ती आम्हास मिळत राहो. याच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.













