ताज्या घडामोडीपिंपरी

“वकील आपल्या दारी” देशातील पहिला आणि आगळा वेगळा उपक्रम – सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दर्द से हमदर्द तक ट्रस्ट संस्थेच्या स्वयंसेवकांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी संस्थेचे विश्वस्त ॲड प्रकाश साळसिंगिकर यांनी संस्थेच्या वतीने सन्मानीय राज्यपाल यांना पुष्पगुच्छ,ॲड सुनीता खंडाळे यांनी स्मृतिचिन्ह व ॲड सतिश गोरडे यांनी शाल देऊन सत्कार केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज गरीब आणि गरजू लोकांना तसेच कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी सुरु केलेल्या ‘लीगल एड ऑन व्हील्स’ (‘वकील आपल्या दारी’) या उपक्रमाचा राजभवन, मुंबई येथे शुभारंभ केला. ‘दर्द से हमदर्द ट्रस्ट’च्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

यावेळी राज्यपालांनी ‘वकील आपल्या दारी’ या उपक्रमासाठी सुरु केलेल्या विशेष वाहनाची पाहणी केली व सेवाभावाने विनामूल्य कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकीलांशी संवाद साधला.
ॲड प्रकाश साळसिंगिकर यांनी राज्यपाल महोदयांना संस्थेच्या कामाबद्दल सविस्तर माहिती देताना संस्था ही गरीब व गरजू लोकांना कायदेशीर मदत करते तसेच तुरुंगातील कित्येक वर्षे खितपत पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर साहाय्य पुरवते. अशी सर्व माहिती दिली.
तसेच संस्थेच्या हल्लीच शुभारंभ झालेल्या Legal Aid On Wheels “वकील आपल्या दारी ” या प्रकल्पाची माहिती देताना साळसिंगिकर यांनी सांगितले की संस्था ही महाराष्ट्रातील सर्व कारागृहामधील अतिरिक्त प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या गंभीर समस्येवर काम करताना तुरुंगामध्ये येणाऱ्यांची देखील संख्या कमी व्हावी या साठी काम करते म्हणजेच गुन्हा घडूच नये यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती करते व त्यांच्या समस्या या कोर्टापर्यंत जाण्यापासून थांबवते. तसेच अनेकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन कायदेशीर साहाय्य पुरवते.

सदरचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे असे म्हणत राज्यपाल महोदयांनी ही
“ही देशातली पहिलीच आणि आगळी वेगळी संकल्पना आहे” असे सांगितले व वकील आपल्या दारी या संस्थेच्या गाडीची पाहणी देखील केली व पुढीच वाटचालीस शुभेच्या दिल्या. संस्थेमार्फत लावलेल्या प्रदर्शनी ला सुद्धा माननीय राज्यपाल साहेबांनी भेट दिली व त्यावेळी असे सांगितले की स्थानिक भाषेमध्ये जर वृत्त छापून आले किंवा अन्य सामग्री स्थानिक भाषेत असेल तर जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. महाराष्ट्रात असल्याने मराठीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, गाव खेड्यातील चौकात बसणारा व्यक्ती वृत्तपत्राचा प्रत्येक भाग वाचून काढत असतो असे त्यांनी सांगितले. जेल मधील अधिकाऱ्यांनी छोट्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर केले पाहिजे व न्यायालयांनी त्यांच्या केसेस ऐकून त्वरित निपटारा केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले. संस्था करीत असलेले काम महत्त्वाचे असून अशा कामाचे स्वरूप वाढवण्याची गरज आहे असे सांगताना त्यांनी भविष्यात दर्द से हम दर्द तक ट्रस्टच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडेल असे सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी, संस्थेच्या ॲड सायली गोरडे, ॲड गणेश नागरगोजे, ॲड नितीन हजारे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी ॲड विघ्नेश्वर सुब्रमण्यम यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे संस्थेचे कामकाज समजावून सांगितले तर ॲड ओमकार पाटील यांनी उपस्थित सर्वांची ओळख करून दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button