ताज्या घडामोडीपिंपरी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२५

नवी सांगवी येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आयोजन आमदार शंकर जगताप यांची माहिती

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

महा शिबिराचे मुख्य संयोजक व पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी ही माहिती दिली.

शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या मोफत सेवा :

– मोफत कॅन्सर तपासणी
– मोफत X-Ray
– मोफत सोनोग्राफी
– मोफत सर्व रक्त तपासण्या
– मोफत डायलिसीस आणि उपचार
– दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व आवश्यक उपकरणे

विशेष तपासण्या व शस्त्रक्रिया :

शिबिरात विविध आजारांवरील तपासणी आणि उपचार मोफत करण्यात येणार आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने खालील शस्त्रक्रिया व उपचार समाविष्ट आहेत :

– हृदय रोग: शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण
– किडनी विकार: किडनी प्रत्यारोपण
– लिव्हर व कॅन्सर उपचार: लिव्हर प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन
– हाडांचे विकार: गुडघे प्रत्यारोपण, हिप प्रत्यारोपण, मणक्यांचे आजार
– नेत्ररोग: मोफत चष्मे वाटप, डोळ्यांवरील शस्त्रक्रिया
– बालरोग व स्त्रीरोग: लहान बालकांच्या हृदयातील छिद्राची शस्त्रक्रिया, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी
– दिव्यांगांसाठी सहाय्य: अत्याधुनिक कृत्रिम हात व पाय तसेच कॅलीपर्सचे मोफत वाटप
– आयुर्वेदिक उपचार: न्युरोथेरेपी, योगा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी, नॅचरोथेरपी

शिबिरात सहभागी होणारी प्रमुख रुग्णालये :

या आरोग्य शिबिरात अनेक नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत, त्यामध्ये प्रमुख आहेत :

– ससून हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, औंध
– टाटा मेमोरिअल हॉस्पिटल (मुंबई)
– आदित्य बिर्ला हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
– डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड)
– एम्स हॉस्पिटल, पुणे हॉस्पिटल, सिल्व्हर बर्च मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल
– भारती हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, आयसीटीआरसी वाघोली, वेदांत सेंट्रल हॉस्पिटल (मुंबई)

शिबिराचे ठिकाण आणि वेळ :

– स्थळ: पी.डब्ल्यू.डी. मैदान, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे – २७
– तारीख व वेळ: २८ फेब्रुवारी २०२५ आणि ०१ मार्च २०२५, सकाळी ०९:०० ते संध्याकाळी ०६:००

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

– ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड)
– पूर्वीचे वैद्यकीय अहवाल (असल्यास)

नोंदणी आणि संपर्क:

ऑनलाईन नावनोंदणीसाठी [www.spjfoundation.com](http://www.spjfoundation.com) ला भेट द्या किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधा :
८७६७८५७६११, ७५७५९८११११

आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा मानून नागरिकांनी मोठ्या संख्येने या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button