चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा बक्षीस वितरण व स्पर्धेचा समारोप

Spread the love

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा बक्षीस वितरण व स्पर्धेचा समारोप शहराध्यक्ष  शंकर जगताप  यांच्या उपस्थितीत  संपन्र झाला.

कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा आणि मा.नगरसेविका सौ. माधुरीताई कुलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ दळवीनगर,वाल्हेकरवाडी येथे भव्य पुणे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्टीय स्तरावरील महिला व पुरूष कॅरमपटू खेळाडूंनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री.शंकरभाऊ जगताप यांनी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी यांच्या कार्याच कौतुक करून सर्व खेळाडू व असोसियन पदाधीकारी यांचे अभिनंदनही केले.व उपस्थित राहून सहभागी खेळाडूंसोबत संवाद साधला. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच विजेत्या खेळाडूंना बक्षीसांचे वाटप केले.

यावेळी स्पर्धेचे आयोजक  माधुरी कुलकर्णी,  बिभीषण चौधरी, भाजपाचे मंडल अध्यक्ष  सोमनाथ भोंडवे, उद्दोजक  दीपक भोंडवे मिरजकर मॅडम, जयराम काळे,अशोक वाळूंज,अमित भोईटे तानाजी वायकर ,कॅरम असोसिएशन पुणे जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी,जेष्ट नागरिक संघाचे सर्व पदाधीकारी व महिला नागरिक बंधू भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजक मोना कुलकर्णी , बिभीषण चौधरी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button