रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल भोसरी व अलायन्झ क्लब ऑफ पिंपरी चिंचवड च्या संयुक्त विद्यमाने डाॅक्टर्स डे साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल भोसरी व अलायन्झ क्लब ऑफ पिंपरी चिंचवड च्या संयुक्त विद्यमाने काल डाॅक्टर्स डे,चार्टर अकाऊंटंट डे व बळीराजा डे साजरा करण्यात आला.
यावेळी भोसरी येथील विविध डाॅक्टर्स,चार्टर अकाऊंटंट व प्रातिनिधिक स्वरूपात बळीराजा यांना शाल व रोप देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी केक कापून तसेच सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सी.ए.डॉ.अशोककुमार पगारिया ,विजय बागडे व डॉ.संतोष मोरे, डॉ.योगेश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
बळीराजा प्रतिनिधी बाळासाहेब कोते,विजय बागडे, CA डॉ.अशोककुमार पगारिया, व डाॅक्टर्स रो.डाॅ.योगेश गाडेकर,रो.डाॅ.संतोष मोरे, डॉ.प्रशांत पवार, डॉ.पवन धारूरकर,डॉ.योगेश पोटे, डॉ.अविनाश तळोले, डॉ.ऋतुजा उचाळे, डॉ.विद्या फल्ले यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी प्रेसिडेंट श्री.ज्ञानेश्वर विधाते, प्रेसिडेंट इलेक्ट रो.दिपक सोनवणे,माजी अध्यक्ष रो.रामदास जैद,अलायन्झ क्लब आॅफ पिंपरी चिंचवड अध्यक्ष व रोटरीयन आण्णासाहेब मटाले, सुनिल पाटे पाटील,रो.प्रा.सचिन पवार,रो.रोहित भांबुर्डेकर,रो.दत्तात्रय कोल्हे,रो.केशव काळदाते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.संतोष मोरे,रो.आण्णासाहेब मटाले व सुनिल पाटे पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.🙏













