ताज्या घडामोडीपिंपरी
राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने निषेध

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राहुरी येथील वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने निषेध करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकीली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड.राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव हे दाम्पत्य गुरुवारी दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले .
सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून आज पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील वकील पुरुष बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सदर वकिल दाम्पत्य हत्येचा तीव्र शब्दात सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, ॲड. सुनील कडुस्कर, व ॲड. मामा खरात, ॲड. बी. के.कांबळे, ॲड. गजेन्द्र तायडे, ॲड. योगेश थांबा, ॲड.संगिता कुशाळकर, ॲड.सविता तोडकर, अँड. पुनम शर्मा,ॲड.संगिता तोडकर,ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. काका काळभोर,ॲड. लाळगे पाटील, आदींनी निषेध व्यक्त केला तसेच सर्व वकील बांधवचे वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी व लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा पारित करावा. यावेळी महिला अध्यक्षा अँड. प्रमिला गाडे उपाध्यक्ष अँड. गोरख कुंभार, सचिव अँड. अक्षय केदार,अँड. ऑडिटर अँड. संतोषी काळभोर, सदस्य अँड. जयेश वाघचौरे,अँड. तेजस चवरे,अँड. विशाल पौळ,अँड. साक्षी धुमाळ,अँड गीतवली जाधव,अँड. निलम जाधव, तसेच अँड. प्रविण जाधव,अँड. सागर पोवार, अँड.रोहीत भोसले, अँड.विनोद आढाव आदी उपस्थित होते.














