आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयातर्फे दिनांक २५/०१/२०२५ रोजी निवडणूक साक्षरता क्लब कडून राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त “नागरिकांचा मतदानाचा हक्क” या विषयावर विक्रांत शेळके (सहाय्यक प्राध्यापक,प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज, आकुर्डी ) यांच्या गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी श्री. शेळके यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची गरज सांगून, मतदान प्रक्रियेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला, तसेच मतदान करण्याचे परिणाम हे उदाहरणासह सांगितले. यावेळी निवडणूक साक्षरता क्लबचे शिक्षक समन्वयक प्रा. प्रणव मुळे यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगून, मतदान वाढीसाठीच्या उपाययोजना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्सह दर्शवला. यावेळी विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विवेक सावकारे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.अंकिता व्हटकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. अजित पतंगे, प्रा. पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे, प्रा. प्रियांका दोशी,प्रा. अंकिता व्हटकर,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

















