राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सरकार व निवडणूक आयोग यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निदर्शने केली.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी “महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” आले शंभर गेले शंभर शरद पवार एक नंबर””आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार शरद पवार” या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “निवडणूक आयोगाचा आज आलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा आहे. देशात सर्व राज्यात भाजप विरोधी पक्षांना संपवण्याचा डाव मोदी सरकारचा असून याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याआधीही राज्यात शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कित्येक वेळा पन्नास-साठ आमदार स्वतःच्या हिमतीवर निवडून आणलेले आहेत. आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून आणायची क्षमता आणि ताकद फक्त आदरणीय पवार साहेबांचे कडेच आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह चा डाव खेळून हिसकावून घेतला असेल. परंतु आमच्यासाठी शरद पवार साहेब हेच चिन्ह आणि हेच पक्ष आहेत. सत्तेचा उन्माद करणाऱ्या या भाजप सरकारला येणाऱ्या निवडणुकीत जनता योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी बोलताना महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर म्हणाल्या “शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना महाराष्ट्राच्या जनतेने पन्नास वर्षे आशीर्वाद दिलेला आहे. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांना निवडणुकीत 50 टक्के आरक्षण देऊन राज्यातील महिलांना सत्तेत बरोबरीचा वाटा दिलेला आहे त्यामुळे राज्यातील महिला फक्त पवार साहेबांच्या पाठीशी उभ्या राहतील. पक्षाशी गद्दार करणाऱ्यांना आज मी एवढेच सांगेल की बाप हा बापच असतो असेही त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष सागर तापकीर म्हणाले”महाराष्ट्रातील युवक आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या पुरोगामी विचाराशी संलग्न असून येणाऱ्या काळात पवार साहेबांची ताकद महाराष्ट्राला दाखवून देईल.
यावेळी बोलताना भोसरी विधानसभा अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे म्हणाले ” आजचा निर्णय हा भारतीय संविधानाला काळीमा फासणारा असून चिन्ह आणि पक्ष शरद पवार साहेबांकडून काढून घेतला असला तरी शहरातील मतदारांच्या मनातून शरद पवार साहेबांना काढणं अशक्य आहे.”
यावेळी युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, प्रवक्ते माधव पाटील, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला उपाध्यक्ष रेखा मोरे, जिल्हा सरचिटणीस मेघराज लोखंडे, शहर संघटक अश्रफ शेख, राजेश हरगुडे, नितीन मोरे, सचिन शिंदे, हाजी मलंग शेख, समाधान आचलखांब, तनवीर अहमद, पियुष अंकुश, साहिल वाघमारे,मयूर खरात,उमेश धोत्रे आणि मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.













