ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील युवक चे पदाधिकारी विशाल वाकडकर आणि विशाल काळभोर यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी उपस्थित होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि त्यांच्यासोबत १४ नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत, असे वृत्त होते. त्यानंतर आता युवक सेलमधील बड्या पदाधिकाऱ्यासह पिंपरी विधानसभा अध्यक्षांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.













