ताज्या घडामोडीपिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी विशाल काळभोर

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी अतिशय उत्तम पध्दतीने सांभाळल्यानंतर विशाल बाळासाहेब काळभोर यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि.6) विशाल काळभोर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अण्णासाहेब बनसोडे, माजी आमदार विलासराव लांडे-पाटील, माजी महापौर योगेश बहल, माजी वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष शाम अण्णा लांडे, प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, फजल शेख, प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे यांच्यासह जेष्ठ नेते, नगरसेवक, नवनियुक्त पदाधिकारी आदी उपस्थित होते.
नियुक्तीनंतर विशाल काळभोर म्हणाले की, ”प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक प्रदेश संघटक, नाशिक़ जिल्हा प्रभारी व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक समन्वयक त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस पदी वर्णी लागली. पुणे शहर जिल्हा प्रभारी आणि आता ही आणखी मोठी जबाबदारी. हे केवळ पद नसून पक्षाने माझ्या कार्यक्षमतेवर दाखवलेला दृढ विश्वास आहे. आणि तो योग्य असल्याचे मी माझ्या कामातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढीकरिता जबाबदारीने आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न करेन.”
तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची ध्येय-धोरणे आणि दादांनी केलेला शहराचा विकास हे घरोघरी पोहचविण्याचे काम करण्याची ग्वाही काळभोर यांनी दिली.













