चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

राम वाकडकर यांचा राजीनामा व आरोप म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बदनामीचे सुनियोजित कटकारस्थान – राजू दुर्गे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पक्ष सदस्यत्व राजीनाम्याचे सोशल मीडियावर समजले. राजीनामा देताना त्यांनी भाजपवर तसेच जगताप कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करीत स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यांचा राजीनामा व आरोप म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बदनामीचे सुनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे यांनी केला आहे.

याबाबत राजू दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप पक्षात प्रवेश करताच राम वाकडकर यांना २०१७ ची महापालिका निवडणुक लढविण्याची संधी पक्षाने दिली. त्यावेळी त्यांच्यासह भाजपच्या संपूर्ण पॅनलचा पराभव होऊनही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाकडकर यांना पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी संधी दिली. मात्र तरीही वाकडकर हे पक्षाच्या कोणत्याही बैठकीस किंवा कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत की त्यांनी प्रदेशाकडून आलेला पक्षाचा कोणताही कार्यक्रम त्यांच्या वाकड प्रभागात राबविला नाही. त्यांच्या प्रभागातील बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख ही रचनाही कधी पूर्ण केली नाही. असे असतानाही पक्षाने त्यांना कधीच डावलले नाही. मग त्यांच्यासोबत गटबाजी झाली अथवा अन्याय झाला असे कसे म्हणता येईल?

वाकडकर यांनी पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. त्यामुळे येथे घराणेशाहीचा प्रश्न उद्भवत नाही. याउलट पोटनिवडणुकीत आपण पक्षाचे काम केल्याचा कांगावा करणाऱ्या वाकडकर यांच्याच प्रभागातून अश्विनी जगताप या पिछाडीवर होत्या. त्यामुळे त्यांनी पक्षाचे काम केल्याचा दावाही खोटा आहे. ज्या जगताप कुटुंबाने वेळोवेळी वाकडकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अनेकदा पक्षाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली. त्याच जगताप कुटुंबावर केलेला मनमानी कारभाराचा आरोप हा तर निव्वळ थोतांड असल्याचे दुर्गे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button