ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणाचे घरोघरी जाऊन वाटप

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रामलला प्रतिष्ठानकडून आलेल्या पवित्र मंगल अक्षता आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणाचे घरोघरी जाऊन  शत्रुघ्न काटे यांनी  वाटप केले.

तमाम हिंदुस्थानच्या जनतेचे गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नच ठरलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या 22 जानेवारीला सत्यात उतरत आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा अशी इच्छा देशाच्या प्रत्येक भारतीयांची आहे. प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे.त्या अनुषंगाने  शत्रुघ्न काटे यांनी घरोघरी जाऊन श्रीराम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने घरोघरी अक्षता आणि मंदिराचे फोटो पाठवून 23 जानेवारीपासून श्री रामाच्या दर्शनासाठी यावे असं आग्रहाचं निमंत्रण पाठवलं जाते आहे.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व रामभक्तांना भावनिक आवाहन केले आहे की २२ जानेवारी रोजी सर्वांनी अयोध्येत येणे टाळावे कारण की जनसमुदाय सागर अयोध्येत आल्यास सुखसोयी सुविधेचा तुटवडा उद्भवू शकतो परिणाम भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ शकते. प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभागातील राम भक्तांसाठी २२ जानेवारी रोजी “भव्य सामूहिक आरती सोहळ्याचे” आयोजन केले असून मंगल अक्षता आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणा सोबतच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

२२ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन , गोविंद यशदा चौक याठिकाणी या “भव्य सामूहिक आरती सोहळ्याचे” निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा अयोध्या थेट प्रक्षेपण, भजन संध्या, रामरक्षा रामनाम जाप पठण, रामलीला कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व लेजर शो चे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi