राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये उन्हाळी सुट्टीनंतर चा पहिला दिवस असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बोधिसत्व प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय गोकुळजी गायकवाड , संस्थेचे सचिव सन्माननीय एल.एस. कांबळे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पोपट आरणे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आवर्जून उपस्थित होते.
यावर्षी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. विद्यालयामध्ये यावर्षी बदलीने नव्याने रुजू झालेले संतोष घरडे , प्रमोद डोंगरदिवे , आनंद गोंदिल तसेच स्वप्निल पठारे काका यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी शिंदे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.













