रहाटणी पिंपळे सौदागर भागात एक मुठी अनाज उपक्रम, 72 सोसायटीचा सहभाग

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी येथील लक्ष्मी भक्ती सोसायटी गेली अनेक वर्षे संपूर्ण वर्षभर सोसायटी चे सर्व सभासद एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन,होळी,धुलिवंदन, दहीहंडी, स्वातंत्र्य दिन,नवरात्री गरबा, दसरा कोजागिरी, तसेच गणेशोत्सव असे विविध सण साजरे करतात तसेच करोना च्या काळात आसपास भागात जर करोना पेशंट घरीच कोरंनटाईन होत असत अशा पेशंटचया घरी विनामूल्य मदत केली जात होती.या वर्षी विशेष म्हणजे सोसायटीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोसायटी मध्ये सफाई कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
या सोसायटीत च्या माध्यमातून रहाटणी पिंपळे सौदागर या भागात एक विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येतो तो म्हणजे एक मुठी अनाज या उपक्रमाला या भागातील जवळ पास बहहातर सोसायटी सहभागी झाल्या आहेत या सोसायटीमध्ये दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक मुठ भर धान्य प्रत्येक सभासदांकडून जमा केले जाते आणि ते धान्य अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आश्रम शाळा,अशा विविध सामाजिक संस्थांना मदत केली जाते आज पर्यंत तीन वर्षांत जवळ पास एक लाख पंचेचाळीस हजार ( १,४५००० ) किलो धान्य जमा करून वाटण्यात आले आहे आणि अजून एक उत्तम उपक्रम म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजुबाजूच्या परिसरात सोसायटी सभासद एकमेकांच्या सोसायटी मध्ये जाऊन भेट देत असतात या अशा लक्ष्मी भक्ती सोसायटी चा आदर्श शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच मंडळ आणि सोसायटींनी घ्यावा ही विनंती. तसेच या सोसायटीच्या सभासदांना या वर्षी च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतर संस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमाचे संयोजक उमेश पाटील अध्यक्ष,कमल रिझवानी अध्यक्ष सांस्कृतिक कार्यक्रम, स्वप्निल पांढरे, आशिष पाटील, भुषण पाटील, योगेश भावसार, पंकज फिरके,किरण खोले,रेखा अहिरराव, सोनाली चौधरी, पूर्वी गोविल तसेच सोसायटीचे पदाधिकारी सभासद करीत असतात.













