रहाटणीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशी वृक्षांचे रोपण

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा पुढाकार
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी प्रभाग क्रमांक २७मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, उद्योजक अनिल नखाते, अजय कदम, संदीप गोडांबे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंकुश कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी यांच्यासह प्रभागातील नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, वृक्ष म्हणजे निसर्गाचे खरे रत्न. ते आपल्याला केवळ जीवनावश्यक ऑक्सिजनच पुरवतात असे नाही, तर आपल्या जीवनातील अनेक पैलूंचा समृद्धी करणारा महत्त्वपूर्ण घटक आहेत. वृक्षांची संख्या कमी होणे म्हणजे आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचा संतुलन बिघडणे. त्यामुळे वृक्षांचे महत्त्व समजून त्यांचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे.













