ताज्या घडामोडीपिंपरीभोसरीमहाराष्ट्र

रवी लांडगे यांनी हाती बांधले शिवबंधन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उबाटा गटात प्रवेश

Spread the love
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी नेते रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आज मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी, मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे शिवसेनेत औपचारिकरित्या प्रवेश करणार असून रवी लांडगे यांच्या हाती मशाल असणार आहे. प्रवेश सोहळ्यासाठी लांडगे यांच्यासोबत सुमारे ५०० वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला होता.
रवि लांडगे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते भाजपकडून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निवडीसोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तेचा पाया रचला गेला होता. लांडगे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने आणि निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जात होते. आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाहीमुळे रवि लांडगे हे भाजप सोडून शिवसेनेत जात आहेत.
गेल्या काही वर्षांत पक्षांतर्गत राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. रवी लांडगे यांना महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे आश्वासन देऊनही शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले, असा आरोप रवी लांडगे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदारसंघातून रवि लांडगे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button