रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या ०७ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) रयत विद्यार्थी विचार मंच संस्था शिक्षण, रोजगार,आरोग्य, क्रीडा,कला,महिला सक्षमीकरण या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २०१७ पासून कार्यरत आहे. सांगण्यात अतिशय आनंद होत आहे कि यावर्षी संस्थेचा ०७ वा वर्धापन दिन साजरा करित आहोत.
या उभरत्या समाजाची उभारणी करणाच्या हातांना प्रोत्साहन व कौतूक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी संस्था महाराष्ट्रातील प्रा. स्वामीराज भिसे यांना शिक्षण क्षेत्रातील कर्मवीर भाऊराव पाटील रयत गौरव पुरस्कार, चंद्रकांत जगताप यांना रोजगार क्षेत्रातील रतन टाटा रयत गौरव पुरस्कार, डॉ.फैज सय्यद यांना आरोग्य क्षेत्रातील संत मदर तेरेसा रयत गौरव पुरस्कार, हर्ष राऊत व विजय कापसे यांना कला क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रयत गौरव पुरस्कार, बुद्धभूषण गायकवाड यांना क्रीडा क्षेत्रातील खाशाबा जाधव रयत गौरव पुरस्कार, सायली धनाबाई यांना महिला सक्षमीकरण क्षेत्रातील जोती-साऊ रयत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच तरुणांनी/विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आर्थिक नियोजन कसे करावे ? याबाबत आर्थिक साक्षर व्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मनी अकॅडमीचे संचालक आकाश गोंदावले हे मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रम विद्यार्थी तरुणांसाठी विनामूल्य असणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम वेळ : रविवार,दिनांक २२ डिसेंबर २०२४. सायंकाळी : ०५ वाजता,स्थळ : आचार्य अत्रे रंगमंदिर,संत तुकाराम नगर,पिंपरी पुणे.१८ या ठिकाणी पार पडणार आहे. या कार्यक्रमास रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे हितचिंतक,सहाय्यक,विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.













