चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

योगदान प्रतिष्ठान व नेत्रजोत डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांचे तपासणी व चष्मे वाटप

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगदान प्रतिष्ठान व नेत्रजोत डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांचे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

योगदान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शंकर शेठ जगताप संकल्पनेतून आयोजित करण्यात आले.

सदर शिबीरास प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
सदर शिबीराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड भाजपाचे उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे यांच्या शुभहस्ते व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी परबत गुरुजी, प्रशांत जमादार , पंजाबराव मोंढे, रविंद्र प्रभुणे, मधुकर कुलकर्णी, मंगलदास खैरनार, हरिभाऊ मोहिते, सर्जेराव कोळी, सिताराम सुबंध अजय कुलकर्णी, विजय अरक, कैलास राणे, माधव पाटील, सुभाष पंडित, शिवाजी देशमुख ,महादेव काटकर, शिवाजी राऊत,चंद्रकांत भालके, व वर्षा आचार्य, विजया कारंडे, दिपाली कलापुरे,सरिता कुलकर्णी, सुनंदा राजपूत, कल्याणी खांडेकर,सरिता बिराजदार,माधुरी आहिरे,पल्लवी पाठक,छाया मस्कर आणि जेष्ठ नागरिक महिला भगिनी व सर्व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सुरेश भोईर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button