युवा मुनीश्री उपाध्याय श्री प पू प्रवीणऋषिजी म सा यांना २०२५ चा चातुर्मास करण्याची पिंपरी चिंचवड जैन श्रावक सकल संघाची विनंती

कोपरगाव , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –जैन समाजातील जेष्ठ संत, प्रखर वक्ता, मानवसेवेच्या अनेक ् उपक्रमा़ंचे प्रेरणा स्त्रोत, युवामनीषि , उपाध्याय श्री पूज्य प्रवीणऋषिजी म सा यांच्या दर्शनासाठी पिंपरी चिंचवड मधील 13 जैन श्रावक संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी असे एकूण 40 सदस्य कोपरगाव येथे दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पोहोचले. यावेळी प पू प्रवीणऋषिजी आणि प पू तीर्थेश ऋषीजी यांचे दर्शन घेऊन सर्वांनी त्यांच्याशी वार्तालाप केला .प पू प्रवीणऋषिजी हे रायपूरचा चातुर्मास संपन्न करून पदभ्रमण करीत करीत पुण्यनगरीत येणार आहेत .तत्पूर्वी पिंपरी चिंचवड च्या भक्ती शक्ती नगरीमध्ये भोसरी येथे दिनांक २० फेब्रुवारी रोजी त्यांचे भव्य स्वागत होईल व नंतर चिंचवड स्टेशन येथे होळी चातुर्मासाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे व दिनांक १ एप्रिल रोजी निगडी प्राधिकरण येथे वर्षीतप धारणा कार्यक्रम होईल. महाराज साहेब यांच्या कार्यक्रमांसाठी पिंपरी चिंचवड मधील जैन श्रावक ,श्राविका मोठ्या संख्येने हजर राहतील असे सकल जैन श्रावक संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी डॉ अशोककुमार पगारिया, नितीन बेदमुथा, दिलीप नहार, सुवालालजी बोरा, दिलीप भन्साली यांनी सकल संघाच्या वतीने परमपूज्य प्रवीणऋषिजी म सा यांना, २०२५ चा चातुर्मास पिंपरी चिंचवडच्या भक्ती शक्ती नगरीत संपन्न करण्याची विनंती केली. महाराज साहेब यांनी सर्व संघांच्या विनंती वर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
या दर्शन यात्रेमध्ये खालील संघअध्यक्ष व पदाधिकारी सामील झाले …. प्रा डॉअशोककुमार पगारिया, नितीन बेदमूथा ,दिलीप नहार ,सुवालाल बोरा, सुवालाल बोरा, दिलीप भन्साली ,संतोष गुगळे, सुभाष ओसवाल ,राजेंद्र चोरडिया, वीरचंद बागमार , राजेंद्र कर्नावट, राजेंद्र बोरा, अशोक लुंकड, गणेश चोरडिया, अशोक नहार, अशोक मंडलेचा, शांतीलाल गांधी, कांतीलाल पटवा गिरीश बाफना ,संदीप फुलफगर, विजय कटारिया, प्रवीण गांधी, महावीर सोनिमिंडे, प्रवीण भन्साली, पारस लुंकड, सुनील कोठारी ,रमण शिंगवी, अनिल कुचेरिया , सतीश बोथरा, राहुल बोरा ,संदेश गदिया, गणेश मुथा, संदीप दोशी ,मनीष गदिया, सचिन सोनीग्रा हे सर्व सदस्य उपस्थित होते.कोपरगाव संघाचे अध्यक्ष सीए श्री संजय भंडारी व त्यांच्या कमिटी मेंबर्सनी उपस्थितांचे स्वागत केले व शेवटी महाराजसाहेबांनी मंगलपाठ दिला.













