ताज्या घडामोडीपिंपरी

युवक काँग्रेसच्या ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ अभियानांतर्गत नाटकांद्वारे मनपा शाळांमध्ये जनजागृती

Spread the love

 

प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २५ ते ३१ जुलैदरम्यान राबविले अभियान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या डेंग्यू आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ अभियानांतर्गत शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या शाळांमध्ये नाटकांद्वारे जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने २५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान ‘डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड’ जनजागृती सप्ताह अभियान राबविण्यात आले.
या अभियानात विद्यार्थ्यांसाठी डेंग्यू जनजागृती चित्रकला स्पर्धा, जनजागृती करणारे पत्रक वाटप, शहरभर पथनाट्य तसेच महापालिका शाळांमध्ये नाटकांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख, जिल्हा सरचिटणीस जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, ऋषिकेश जाधव यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button