ताज्या घडामोडीपिंपरी

यमुनानगर निगडी येथील नवीन राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर दीपस्तंभ बसविण्यात यावे – प्रसाद कोलते

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर यमुनानगर निगडी येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये नवीन राम मंदिराचा जिर्णोद्धार येत्या २२ जानेवारीला होणार आहे.नवीन राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर दीपस्तंभ बसवण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिं.चिं.शहर जिल्हा प्रसाद कोलते यांनी आयुक्त व फ क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यमुनानगर निगडी येथे नव्याने होत असलेल्या राम मंदीरासोबतच दत्त मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, तुळजाभवानी मंदिर, विश्वकर्मा मंदिर, स्वामी समर्थ मठ, देवी आई भोलाई मंदिर, हत्ती गणपती मंदिर (भाजी मंडई) हनुमान मंदिर (नाना नानी पार्क), शनी मंदिर, तुळजा भवानी मंदिर, विठ्ठल मंदिर, साई मंदिर या प्रमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावरही प्रशासनाकडून तातडीने दीपस्तंभ बसवण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

या काळात अनेक रामभक्त रामरायांची उपासना करण्यासाठी या नवीन मंदीरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे येथे होत असलेल्या उत्सवाच्या भावनेला हातभार लावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. संबंधित ठिकाणी दिपस्तंभ बसवून सुशोभिकरण केल्यास मंदिर परिसर प्रसन्न,तेजस्वी व अधिक उत्साही वातावरण निर्माण करील असा विश्वास प्रसाद कोलते यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button