यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप येथील अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करा – सचिन काळभोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी रिक्षा रस्त्यावर उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करा अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील भोसरी बस स्टॉप यमुनानगर कॉर्नर ह्या ठिकाणी रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांना रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी समस्या ला बळी पडावे लागत असून यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी पी एम पी एल बस स्टॉप असून मोशी तळवडे चिखली चाकण राजगुरुनगर शिंदे वासुली मरकळ हडपसर देहूरोड आळंदी देहू ह्या ठिकाणी प्रवाशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी अवैध रिक्षा प्रवाशी वाहतूक सुरू असून रस्त्यावर गाड्या उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून बस कंडक्टर व ड्रायव्हर ह्यांना दमदाटी करून अवैध प्रवासी वाहतुक सुरू असून त्या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
यमुनानगर कॉर्नर भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी रिक्षा रस्त्यावर उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे ही निवेदनात म्हंटले आहे.
पिंपरी चिंचवड शहर बस संख्या वाढविण्यात यावी वासुली मरकळ हडपसर आळंदी राजगुरू ह्या भागातील बस संख्या वाढविण्यात यावी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर एम आय डी सी भागात कामानिमित्त ह्या मार्गाचा वापर करत आहे त्यामुळे जास्त बस फेरी वाढवावी, असे ही निवेदनात म्हंटले आहे.














