म. गांधीजींनी विश्वबंधुतेचे विचार रुजवले – काशिनाथ नखाते

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महात्मा गांधी यांनी भारतीय जनतेच्या अंतकरणात विविध संप्रदायातील साधू ,संत यांनी निर्माण केलेल्या विश्वबंधुतांच्या विचार जागतिक स्तरांवर लोकांच्या मनात रुजवले
हिंदू,मुस्लिम, शीख, ईसाई – हम है सारे भाई भाई…असा मानवतेचा संदेश गांधींनी दिला शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन व आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यासह विदेशात अनेकांचे आदर्श झालेले महात्मा गांधीजी यांनी विश्वबंधुत्वाचे विचारांची पेरणी केली असे मत राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज व्यक्त केले
पिंपरी चिंचवड येथील कार्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, अमोल भंडारी, नंदा क्षीरसागर, सलीम डांगे,अशोक क्षीरसागर,ओमप्रकाश मोरया,महादेवी शेंडगे,सविता जगताप, बिरदेव शेंडगे उपस्थित होते.
महात्मा गांधी यांनी सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या असणाऱ्या मीठ,चरखा, कापूस,खादी,शेळीचे दूध यामधून भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज अंकुरले . महान त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक महात्मा गांधी म्हणजे अविरतपणे कष्ट, अहिंसकवृत्ती आणि परस्परातील स्नेहभाव,आयुष्यभर निष्ठेचे पालन करन्यासह ब्रिटिशांना “चले जाव” म्हणून सांगणारी निधडी छाती आणि त्यांचे धैर्य पाहून गांधीजीना भारत देश अभिवादन करत आहे असे गौरवोद्गार नखाते यांनी काढले.














