ताज्या घडामोडीपिंपरी

मोहननगर, आकुर्डी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा – मारुती भापकर

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदि परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेत खूप जोर जोरात भुंकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांची निद्रानाश होते. लहान मुले घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरुन धावतात त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच या परिसरातील सेकंन्ड, थर्ड शिपला जाणाऱ्या, येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे हे कुत्रे धावतात. प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कामावर येणारे जाणारे कामगार आपले वाहन जोरात पळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे यापुर्वी अनेक लहान मोठे अपघात झाले आहे. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वर्षानुवर्ष पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढुन मोकाट कुत्रे पकडुन त्यांचे निर्बिजीकरण करण्याच्या कामाचा ठेका देण्यात आला आहे. महापालिकेने या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी ती वाढतानाच दिसत आहे.

त्यामुळे आयुक्तानी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना करण्याबाबत सक्त आदेश द्यावेत. या गंभीर समस्येचे विनाविलंब निराकारण करावे, जर एखादा मोठा अपघात होवुन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले तर याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असे मारुती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button