ताज्या घडामोडीपिंपरी

3 मार्चला मोशी येथील पिंपरी चिंचवड न्यायसंकुलाचे भूमीपूजन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी सेक्टर नं. १४ मधील १५ एकर जागेमध्ये पिंपरी चिंचवड येथील न्यायसंकूलाच्या इमारतीच्या पहिला टप्प्याचे बांधकाम प्रारूप आराखड्यानुसार २५ न्यायालये तयार होणार आहेत.न्यायसंकूलाचे बांधकाम २४ महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे. न्यायसंकूलाच्या भूमीपूजनासाठी सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती  भूषण गवई , न्यायमूर्ती  अभय ओक , न्यायमूर्ती  प्रसन्न वराळे  यांनी ३ मार्चला  भूमीपूजनासाठी येण्याची तयारी दर्शविलेली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले यांनी दिली.

याबाबत  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर – १२, वरिष्ठ स्तर- ७, जिल्हा व सत्र न्यायालय ६ व त्यास अनुसरून निवासस्थाने मंजूर झालेले आहेत. सदर बांधकामास अंदाजे १२४.५ कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. न्यायसंकुलाचे बांधकाम २४ महिन्यामध्ये पूर्ण करायचे आहे.  न्यायसंकुलाच्या भूमीपूजनासाठी सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती  भूषण गवई , न्यायमूर्ती  अभय ओक , न्यायमूर्ती  प्रसन्न वराळे  यांनी ३ मार्चला दुपारी ४.०० वा. भूमीपूजनासाठी येण्याची तयारी दर्शविलेली आहे. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती. रेवती डेरे , न्यायमूर्ती  संदीप मारणे , न्यायमूर्ती  आरिफ डॉक्टर हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यकमाचे भूमीपूजनासाठी कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून एम. के. महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे हे असणार आहेत. सदर भूमीपूजनासाठी मा. श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय (मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आलेले आहे.

सदरच्या न्यासंकूलाच्या इमारतीच्या वांधकामासाठी आमदार महेशदादा लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे. तसेच न्यायालयाच्या विविध मंजूरी कामाकरिता महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे उपाध्यक्ष अॅड.  राजेंद्र उमाप यांनी विशेष प्रयल केलेले आहेत. सदर भूमीपूजनासाठी महाराष्ट्र आणि गोवा वार कौन्सिल चे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या न्यायसंकूलामुळे पिंपरी चिंचवड शहारातील नागरिकांना न्याय मागण्यासाठी पुणे न्यायालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत. ख-या अर्थाने पिंपरी चिंचवड शहरातील पक्षकारांना या न्यायसंकुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होणार आहे असे पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले यांनी सांगितले. तसेच सदरचे न्यायसंकूलाचे पाठपुराव्यासाठी न्यायमूर्ती श्री अभय ओक यांचे सूचनेप्रमाणे सन २०१६ वर्षी बांधकाम समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीमध्ये अॅड. अतिश लांडगे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. सतीश गोरडे, अॅड. सुशील मंचरकर, अॅड. किरण पवार, अॅड. सुहास पडवळ यांनी वेळोवेळी न्यायालयीन व शासकीय पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी  महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,  न्यायाधीश  सुनील वेदपाठक  तसेच  न्यायाधीश  के. एन. शिंदे  यांनी मोशी येथील जागेची पाहणी करून भूमीपूजनाची जागा प्रस्तावीत केली आहे.

यावेळेस महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, अॅड. माजी अध्यक्ष सचिन थोपटे, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. दिनकर बारणे तसेच पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खिलारी, सचिव अॅड. धनंजय कोकणे, सहसचिव अॅड. उमेश खंदारे, महिला सचिव अॅड. मोनिका सचवाणी, अॅड.संदीप तापकीर, सदस्य ऍड.फारूख शेख, अॅड. मिनल दर्शिले, अॅड. अस्मिता पिंगळे, अॅड. अय्याज शेख, अॅड. मंगेश खरावे, अॅड. संजय जाधव, अॅड. प्रसन्न लोखंडे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button