मोफत कर्करोग तपासणी शिबीराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन ! भगवान महावीर जन्म कल्याणक- अहिंसा सप्ताह निमित्त आयोजन

चिंचवडः, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघ, क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड व वर्धमान जैन श्रावक संघ चिॅचवड स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दोन दिवसीय मोफत कर्करोग तपासणी शिबीराचे उद् घाटन आज क्रस्ना डायग्नोस्टिक लि. चे चेअरमन श्री राजेंन्द्र जी मुथा यांचे शुभ हस्ते महासंघाच्या व विविध जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष व पदाधिकार्यांच्या उपस्थित पार पडला.
प्रा. अशोकजी पगारिया, सुभाषजी ललवाणी , नितीनजी बेदमुंथा , सुभाषजी सुराणा, श्रेयांसजी पगारिया. विलासजी पगारिया,प्रा प्रकाशजी कटारिया, अशोकजी लुंकड, सतिशजी मेहेर, आनंद जी मुथा,डॉ. अशोकजी बोरा, उमेश जी पाटील,विरेश छाजेड, संदीप फुलफगर राजेंन्द्र बोरा, किरण रांका,नेनसुखजी मांडोत,श्रेणिक मंडलेचा, राहुल लुंकड,हर्षद लुंकड, शितल खिंवसरा,बागमार,क्रस्ना डायग्नोस्टिक चे डॉक्टर्स,इत्यादि मान्यवर उपस्थित होते.













