ताज्या घडामोडीपिंपरी
मोनिका स्टीफन यांचे निधन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी मधील ज्येष्ठ नागरिक मोनिका व्हिक्टर स्टीफन यांचे शनिवारी (दि.१) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, दोन मुले, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माध्यम क्षेत्रातील जेष्ठ छायाचित्रकार रूप सिंग यांच्या त्या थोरल्या भगिनी होत. तसेच पुणे, पिंपरी मध्ये विविध वृत्तपत्रात कार्यरत असलेले छायाचित्रकार संजय आणि राजेश स्टीफन यांच्या त्या मातोश्री होत.












