मॉर्डन शिशु मंदिर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि दुर्गा ब्रिगेड संघटना यांची संयुक्त श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त रथयात्रा संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मॉर्डन शिशु मंदिर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि दुर्गा ब्रिगेड संघटना यांची संयुक्त श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त रथयात्रा संपन्न झाली इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय अभय भोर यांनी आयोजन केले .
रथयात्रेत मॉर्डन शाळा समिती अध्यक्ष नंदकिशोर एकबोटे यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व समिती सदस्य उपस्थित होते जंगली महाराज रोड येथे शिवाजीनगर गावठाण परिसरामध्ये लहान मुलांनी प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाईचा श्री हनुमान वेशभूषा परिधान करून रथयात्रा संपन्न झाली विविध वेशभूषा करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेतील बाल विद्यार्थी दुर्गा ब्रिगेड कार्यकर्त्या अनेक पालक व अनेक नागरिकांचा सहभाग होता यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे कु. अवंतिका भोर हिने लाठी-काठीचे प्रदर्शन करण्यात आले तसेच बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले मॉडर्न प्रो सोसायटीचे कार्याध्यक्ष आणि कार्यवाहक श्री शामकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर एकबोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर.विजिटर मा मोनिका वैद्य शाळा समिती सदस्य राहुल सांडभोर सर सौ सुनीता विद्वत यांनी ही संकल्पना मांडली दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर शाळेचे शिक्षक श्री इंगळे सर तसेच माजी विद्यार्थी शांतीलाल डांगी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते









