मेट्रोमुळे शहराचा विकास की पर्यावरणाचा -हास? – सचिन काळभोर

मेट्रोमुळे शहराचा विकास की पर्यावरणाचा -हास?
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे
महामेट्रोने पिंपरी ते निगडी विस्तारीकरणाचे
काम हाती घेतले. सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था सक्षम होणार असली तरी या विकासाच्या मार्गात येणाऱ्या ५७ झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे ही मेट्रो शहराला विकासाच्या दिशेने घेऊन जात आहे की न्हासाकडे निघाली आहे? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या
उद्यान विभागाकडून एक लाख बांबूची लागवड करण्याचा संकल्प नुकताच करण्यात आला आहे. वृक्षतोडीला उद्यान विभागाने बंदी घातलेली आहे. सामान्य पिलर उभारण्यासाठी ५७
झाडांची कत्तल माणसाला राहत्या घराच्या दारातील झाडाची फांदी तोडायची असेल तरी उद्यान विभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, प्रशासकीय आस्थापनांकडून विकासाच्या नावाखाली मोठ्या वृक्षांची कत्तल केली जात आहे.
पिंपरी ते निगडी मार्गावर ४.४१किलोमीटर मेट्रो विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. कामास अडथळा ठरत असल्याने १५ वर्षे जुनी झाडे तोडली
जात आहेत. निगडी येथील लोकशाहीर
अण्णा भाऊ साठे पीएमपीएमएल बस फौजदारी दाखल करा मेट्रोने झारखंड येथील एका कंपनीला विस्तारित मार्गाचे काम दिले आहे.
परंतु, त्याने नेमलेल्या उपठेकेदारामार्फत हे काम केले जात आहे. या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची परवानगी पालिकेने मेट्रोला दिली आहे. त्यामुळे उपठेकेदाराकडून बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.आगाराजवळ खांब (पिलर) उभारण्यात येत असून त्याला अडथळा ठरणारी झाडे तोडली जात आहेत. निगडीतील
वर्तुळाकार उड्डाण पुलाजवळील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या पदपथावरील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
तेथील नऊ झाडे तोडण्यात आली आहेत.निगडी ते पिंपरीपर्यंतच्या पदपथावरीलbझाडे तोडली जात असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत वृक्षतोडीस विरोध केला आहे. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे.
मेट्रोच्या कामात अडसर ठरणा-या झाडांची छाटणी करण्याची परवानगी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्राप्त झाली आहे. एक झाड तोडल्यानंतर त्याच्या बदल्यात दहा झाडे लावण्यास संमती दर्शवली आहे. त्यासाठी पालिकेकडून कासारवाडी मैलाशुध्दीकरण केंद्राची जागा सुचविली आहे. तेथे काही झाडांचे पुनर्रोपण केले जाईल, शक्य नसल्यास एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावली जाणार आहेत. पुढील तीन वर्ष झाडांचे संगोपन मेट्रोकडून केले जाईल. वृक्षारोपण केल्यानंतर गूगल टॅग फोटोसह अहवाल पालिकेला सादर केला जाईल.
– हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक प्रशासन
आणि जनसंपर्क
पुणे मेट्रो वृक्ष प्राधिकरण समिती समोर मेट्रोने वृक्षतोडीसंदर्भात परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. विकास कामात अडसर ठरणारी झाडे तोडण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु, शक्य त्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचे समितीने सुचविले आहे.शिवाय, तोडण्यात येणा-या एका झाडाच्या बदल्यात मेट्रोकडून नवीन दहा झाडे लावण्याचे ठरले आहे.
–
• रविकिरण घोडके, उपायुक्त, उद्यान विभाग













