ताज्या घडामोडीपिंपरी

‘‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’’ योजनेसाठी महापालिका आयुक्तांची ‘एसओपी’ – आमदार महेश लांडगे यांच्या बैठकीनंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर

Spread the love

– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले अधिकाऱ्यांना ‘टास्क’

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’’ योजना पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची ‘व्हीसी’ द्वारे तातडीची बैठक घेतली. त्याद्वारे अधिकारी व संबंधित विभागांना ‘एसओपी’ (आदर्श कार्यप्रणाली) निश्चित करण्यात आली आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी रविवारी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील प्रभागनिहाय तसेच महापालिका शाळा, तहसीलदार कार्यालय, महावितरण कार्यालय अशा शासकीय अस्थापनांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केली होती.

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ‘व्हीसी’द्वारे बैठक घेतली. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त आण्णा बोदाडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त भांडार विभाग निलेश भदाणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, शिक्षण मंडळाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोरडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आयटीआय मोरवाडी येथील प्राचार्य डॉ. शशिकांत पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.

सदर योजनेसाठी महापालिका क्षेत्रीय कार्यालय, त्याअंतर्गत विविध ठिकाणे, विभागीय कर संकलन कार्यालये, प्राथमिक शाळा/ माध्यमिक शाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, तलाठी व मंडल कार्यालये इत्यादी ठिकाणी अर्ज ऑनलाईन स्वीकृती केंद्र सुरू होणार आहेत.

आयुक्तांचे अधिकाऱ्यांना ‘हे’ आहेत निर्देश…
मनपाच्या प्राथमिक/ माध्यमिक शाळांमध्ये योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा करावी. त्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर व मदतनीस नियुक्त करावेत. योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता जिंगलस, व्हीडिओ, व्हीएमडी स्क्रीन, माहितीदर्शक भित्तीपत्रके, हस्तपत्रिका, योजनेचे पॅम्प्लेट तयार करावे. करसंकलन विभाग, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा करावी. तसेच, सदर केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, इंटरनेट व वायफाय सुविधा, तात्पुरती मंडप व्यवस्था, पुरेसे टेबल व खूर्ची, सुरक्षारक्षक, मदतनीस अशा आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. शहरातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, शासकीय इमारती इत्यादी ठिकाणी दर्शक फलक (होर्डिंग) लावावेत.

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात ‘‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’’ राबवण्यात येत आहे. राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच, श्रमबल पाहणीनुसार, पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के आणि स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे. महिलांचा श्रमसहभाग तुलनेत कमी आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button