मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी केली जाहीर

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अखेर आज (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. धनंजय मुंडे यांना यादीतून वगळले आहे. मुंंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न देता त्यांचा जिल्हा असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडबरोबरच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. गडचिरोली, मुंबई उपनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सह पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.
असे आहेत जिल्ह्यांचे पालकमंत्री
गडचिरोली देवेंद्र फडणवीस,
आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)
नागपूर चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
वाशिम हसन मुश्रीफ
यवतमाळ संजय राठोड
चंद्रपूर अशोक उईके
भंडारा संजय सावकारे
बुलढाणा मकरंद पाटील
अकोला आकाश फुंडकर
गोंदिया बाबासाहेब पाटील
वर्धा पंकज भोयर
बीड अजित पवार
जालना पंकजा मुंडे
नांदेड अतुल सावे
लातूर शिवेंद्रसिंहराजे भोसले
नंदूरबार माणिकराव कोकाटे
हिंगोली नरहरी झिरवाळ
छ. संभाजीनगर संजय शिरसाट
धाराशिव प्रताप सरनाईक
परभणी मेघना बोर्डीकर
मुंबई शहर एकनाथ शिंदे
मुंबई उपनगर ॲड. आशिष शेलार,
मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
ठाणे एकनाथ शिंदे
पालघर गणेश नाईक
रायगड आदिती तटकरे
रत्नागिरी उदय सामंत
सिंधुदुर्ग नितेश राणे
पुणे अजित पवार
सोलापूर जयकुमार गोरे
सांगली चंद्रकांत पाटील
कोल्हापूर प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
सातारा शंभूराज देसाई
नाशिक गिरीश महाजन
अहिल्यानगर राधाकृष्ण
विखे-पाटील
जळगाव गुलाबराव पाटील
धुळे जयकुमार रावल
– रायगडचे पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना की शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे जाणार, याबाबत उत्सुकता होती. त्यात तटकरे यांनी बाजी मारली.














