Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितीमध्ये अमित गोरखे यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजपा आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप उपस्थित होते.

विधान परिषदेवर अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version