ताज्या घडामोडीपिंपरी

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी योगा उत्तम पर्याय -अमित गोरखे

Spread the love

 

पिंपरी,  ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योग हा उत्तम पर्याय असल्याचे नोव्हेल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष  अमित गोरखे यांनी सांगितले.

योग दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर शाहूनगर परिसरातील तसेच नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या महिला व पालकांसाठी जागतिक योग दिनानिमित्ताने योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या योग शिबिराला प्राधिकरणातील मीनल जैन यांनी अत्यंत सुंदर रित्या मार्गदर्शन केले योग शिबिराला 300 पेक्षा जास्त महिलांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग होता ,योग आणि मानसिक स्वास्थ यावर मीनल जैन यांनी योग साधना करून महिला मंडळींना योगाचे वेगवेगळे प्रकार समजून सांगत असताना योग करून दाखविला,व्यासपीठावर प्रत्यक्ष नोव्हेल संस्थेचे अध्यक्ष श्री अमित गोरखे यांनीही योग केला, यावेळी बोलताना अमित गोरखे म्हणाले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेला जागतिक योग दिवस 180 पेक्षा जास्त देशांनी स्वीकारला आहे, हा अभिमान भारतीय म्हणून सर्वांना असलाच पाहिजे आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यायाम करत असताना योग सातत्याने केल्यास मानसिक व शारीरिक बळ मिळते व रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आणखी ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे बालवयापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी योगा केला पाहिजे.. योग दिन आहे म्हणून योगा करणे उचित नाही योगासन सातत्य जर आपण अबाधित ठेवलं तर सर्वांनाच याचा फायदा नक्की होईल.

यावेळी नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य डॉ मृदुला गायकवाड, डॉ प्रिया गोरखे, आशिष जैन व्यासपीठावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button