मातंग समाजाने मातंगऋषीची प्रतिमापुजन करुन गुरुपोर्णिमा उत्सव साजरा करावा -डॉ.धनंजय भिसे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येत्या रविवारी (दिनांक 21) रोजी गुरुपौर्णिमा आहे.गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी आपण सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना मनोभावाने समर्पित होत असतो.मुळात गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव समजून गुरु ज्ञान हे शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शैक्षणिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते.तसा हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे.ह्या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।
वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते.मातंग समाजाने पौराणिक काळापासून गुरु शिष्य परंपरा टिकवली आहे पण आजच्या बहुतांश मातंग समाजाला माहित नाही.
मातंगऋषी हे मातंग समाजाचे पर्यायाने मातंगवंशाचे आध्यात्मिक गुरु आहेत.
मातंगऋषीकडे हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना जशी व्यासांकडे जाते तशीच मातंगऋषीकडे सुध्दा येते.यात शंका नाही.
मातंगऋषी हे मातंग वंशाचे होते. ते वेद, धनुर्वेद, धर्मग्रंथ, कला आणि अध्यात्मिक ज्ञानाचे ते मोठे विद्वान होते.त्यांच्या गुरुकुलात वेद, वेदांत आणि उपनिषदांसह चौसष्ट कला शिकवल्या जात होत्या. यासोबत न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धार्मिक शास्त्र, नीतिशास्त्र आणि शस्त्रे हाताळण्याचे शिक्षण व प्रशिक्षणही देण्यात येत होते.मातंगऋषी हे तेजस्वी आणि कर्तृत्ववान ऋषी होते, त्याचबरोबर मातंगऋषींनी वेद, पुराण, शास्त्र इत्यादींच्या शिक्षण ही त्यांच्या आश्रमात दिले जात होते. रामयण,महाभारत, व काही पुराणात त्यांचा उल्लेख सापडतो.
दरवर्षी गुरुपौर्णिमा निमित्त मातंगऋषी यांच्या प्रतिमेची पूजा करून गोरी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करावा.आपला सांस्कृतिक वारसा मातंग समाजाने जतन करणे आज घडीला काळाची गरज आहे. आणि ते सांस्कृतिकदृष्ठ्या महत्त्वाचे आहे.
संदर्भ:गुगल
……… डॉ.धनंजय भिसे
(संस्थापक/अध्यक्ष:मातंग साहित्य परिषद,पुणे)













