ताज्या घडामोडीपिंपरी

मातंग समाजातील महाराष्ट्रातील २८८ मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Spread the love

 

मातंग समाजाला दिशा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे : आ. अमित गोरखे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – समाजाला प्रगती करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. समाजाने एकत्र येऊन त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. आज आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी दिशा देण्याच्या चळवळीत सर्वांनी पुढे यावे. समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने विविध घटकांशी लवकरच संवाद साधणार आहोत, येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे काम सर्वांनी जोमात करावे
असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी येथे केले.

दीपावलीनिमित्त महाराष्ट्रातील समाजाच्या प्रमूख कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आज पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात संपन्न झाला.

आ. गोरखे म्हणाले, “राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणात तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून एक आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. यासाठी घेतलेला पुढाकार हा माझा छोटासा प्रयत्न आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी जे जे काम करावे लागेल त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ या… महायुतीने मातंग समाजाला आज पर्यंत सर्व काही दिले त्यामुळे त्यांच्या सोबत राहू यात…..

ते म्हणाले, “आज 2८८ निमंत्रित केलेल्या लोकांपैकी 232 हजर आहेत,हे आपले प्रेम आहे. यापुढील काळातही दरवर्षी दीपावली मिलन मेळावा आयोजित केला जाईल. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात 40,000 किलोमिटरपेक्षा अधिक प्रवास करून समाजाच्या भावना जाणून घेतल्या आहेत. यामुळे समाजाच्या अधिक जवळ जाण्याची संधी मला मिळाली. समाजात आपले प्रतिनिधी उच्च पदस्थ शासकीय अधिकारी बनतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. समाजाला विविध अडचणीच्या प्रसंगी समाजाकडून आलेल्या हाकेच्या प्रतिसाद देण्यासाठी कायम तत्पर आहे. प्रत्येकाने आपल्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा.”

दीपावलीनिमित्त आज अमित गोरखे यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.. यावेळी उपस्थितांना दीपावलीनिमित्त सुबक पणत्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आज आपले मनोगत व्यक्त केले.

सातारा,सांगली,कोल्हापूर ,सोलापूर, बीड, मुंबई,अहिल्यानगर, धाराशिव , छत्रपती संभाजी नगर, वर्धा, यवतमाळ,अमरावती नागपूर, परभणी, जालना,नांदेड, लातूर, हिंगोली ,नाशिक,आदी भागातून असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा, मा. नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, स्मारक समितीचे अध्यक्ष,अशोक लोखंडे,अण्णा धगाटे ,गणपत भिसे, शंकर तडाखे,भगवान वैरागर, चंद्रकांत काळोखे,कृष्णा वाघमारे,भाऊसाहेब अडागळे, सांदिपन झोंबाडे,भास्कर नेटके, बाप्पू घोलप, आनंद सुतार, राज सोनवले, इंदर शेंडगे,नितीन घोलप,अविनाश कांबीकर आदी मान्यवर यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले अनेक मान्यवर, लोक प्रतिनिधी,समाज बांधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button