माजी नगरसेवक शाम लांडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कासारवाडी येथील माजी नगरसेवक श्याम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्याम आण्णा लांडे मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी निवृत्ती लांडे ,रमेश लांडगे, संजय लांडे, विठ्ठल राजपुरे ,दादासाहेब बरसाळ, सयाजी लांडे ,शरद आवटे भानुदास लांडगे ,पंडित लगारे ,अमित लांडे, संजय कुंदर, गणेश मातेरे, आशिष लांडे ,आशुतोष लांडे, संग्राम घाटविसावे, ज्ञानेश्वर कवडे, दत्तात्रय पवार , गिरीश नायर, तुषार लांडे,प्रसाद कुलकर्णी ,सखाराम जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान, हृदयविकार, मधुमेह चाचणी व तपासणी, तसेच बीसीजी लसीकरण करण्यात आले. या आरोग्य शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रशस्तीपत्र भेट म्हणून देण्यात आले.ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
तसेच शिबारात सहभागी झालेल्या नागरिकांना पाच लाख रुपये चा आरोग्य विमाचे मोफत वाटप करण्यात आले . डॉ. डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या सहकार्याने पार पडलेल्या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला.
तसेच रविवारी सकाळी कासारवाडी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांना स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते.













