ताज्या घडामोडीपिंपरी

माऊलींच्या पालखी सोहळ्याची अलंकापुरीत हरिनाम गजरात सांगता

Spread the love

हजेरी मारुती मंदिरात परंपरेने हजेरी ; दर्शनास भाविकांची गर्दी
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशल्या नंतर एकादशी दिनी बुधवारी ( दि. ३१ ) श्रींचे पायी वारी पालखी सोहळ्याची सांगता मानकरी, वारकरी भाविकांचे उपस्थितीत हरिनाम गजरात हजेरी मारुती मंदिरात दिंडी प्रमुख विणेकरी यांचे अभंगरूपी सेवा रुजू करीत हजेरीच्या कार्यक्रमाने देवस्थानचे वतीने हरिनाम गजरात झाली. आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दर्शनास लाखावर भाविकांनी कामिका आषाढी एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी परंपरेने देवस्थान तर्फे आणि कुऱ्हाडे पाटील, डॉ. नाईक परिवाराचे वतीने नारळ व प्रसाद वाटप करीत सांगता झाली. आषाढी एकादशी निमित्त श्रींचे मंदिरात तसेच हजेरी मारुती मंदिरात गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता.
या प्रसंगी आळंदी संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, पुजारी अमोल गांधी, राजाभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष मानकरी राहूल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरू,स्वप्नील कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक यांचेसह दिंडीकरी, विणेकरी मंदिरात उपस्थित होते.

परंपरेच्या उपचारात मंदिरात परंपरेने श्रीना पवमान अभिषेख, दुधारती झाली. श्रीना नैवेद्य झाला. यावर्षी श्रींचे पालखीचे नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मंदिर प्रदक्षिणेत सोहळ्यातील दिंड्यांतील विणेकरी यांचे अभंग झाले. आषाढी एकादशी असल्याने मंदिरात श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा आणि एकादशी निमित्त नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.

ख-या अर्थाने सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. टाळ मृदंगाचा निनाद, हरी नामाचा जयघोष करीत श्रींचा चांदीचा लक्षवेधी मुखवटा फुलांनी सजलेल्या पालखीत विराजमान करीत श्रींचे पालखीची आषाढी एकादशी दिनी वैभवी मंदिर व नगरप्रदक्षिणा झाली. माऊलींचे पायी वारी पालखी सोहळा कालावधीत मंदिरात नित्य नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. चक्रांकित महाराज परिवार तर्फे हरिपाठावर आधारित कीर्तन सेवा रुजू करण्यात आली. यावेळी उपस्थितांना श्रवण सुखाची ज्ञानभक्तीमय पर्वणी लाभली.

आषाढी एकादशी दिना निमित्त आळंदी मंदिरात प्रथा परंपरेचे पालन करीत श्रीची पूजा, आरती, रुद्राभिषेख, पूजा,फराळाचा महानेवेद्य,धार्मिक कार्यक्रम झाले. यासाठी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, तुकाराम माने, महेश गोखले , राजाभाऊ चौधरी, बल्लाळेश्वर वाघमारे, पुरुषोत्तम डहाके यांचेसह सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर देवस्थान तर्फे वारी सोहळ्यातील मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.

यावेळी संस्थान कमिटीचे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, श्रीकांत लवांडे, बल्लाळेश्वर वाघमारे, संजय रणदिवे, ज्ञानेश्वर पोंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हजेरी मारुती मंदिरात श्रीचे पालखी सोहळ्यातील सर्व दिंडीकरी यांची अभंग रुपी सेवा होवून हजेरी घेण्यात आली. यावेळी परंपरांचे पालन करीत कुऱ्हाडे पाटील व नाईक परिवार यांचे तर्फे नारळ प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता देवस्थानचे नियंत्रणात झाली. हजेरी मारुती मंदिरात आळंदी ग्रामस्थ आणि नवशिव शक्ती तरुण मंडळाने पुष्प सजावट साठी परिश्रम घेतले. हजेरी कार्यक्रमा नंतर श्रींची पालखी मंदिरात हरिनाम गजरात आली. मंदिर प्रदक्षिणा, आरती, मानकरी यांस देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले. या नंतर श्रींची आरती झाली. या सोहळ्याचे सांगते दिनी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्रामप्रदक्षिणा उत्साहात झाली. श्रींचे पालखी सोहळयाचे यशस्वीतेसाठी पालखी सोहळ्याचे बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ रंधवे चोपदार, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चीतळकर पाटील, योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी, अमोल गांधी, यशोदीप जोशी आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान श्रींचे पालखी सोहळ्याचे काळात शांतता, कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासह, सुरक्षित सुरळीत वाहतूक ठेवण्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शनात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, दिघी आळंदी वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब ढमाळ, आळंदी पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आणि पोलीस सेवक, कर्मचारी, अधिकारी, पोलीस मित्र शिवाजी जाधव, रवींद्र जाधव, वैभव दहिफळे आदींनी सेवा रुजू केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi