महाविद्यालयाचे स्टेडियम की मद्यपींचा अड्डा, मद्यपी मुळे मैदानावर येणाऱ्या जेष्ठ नागरिक व महिलांना होत आहे त्रास – सुहास कुदळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी गाव महात्मा फुले महाविद्यालय व नव महाराष्ट्र विद्यालय मैदान या महाविद्यालयाच्या परिसरात आहे. या ठिकाणी असलेल्या स्टेडियमवर रोज संध्याकाळी मद्यपींचा अड्डा असतो. या परिसरात लाईट बसविण्यात यावी, अशी मागणी पिंपरी गावातील युवा नेते सुहास कुदळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विद्युत विभागाकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथे असलेल्या दोन स्टेडियम मध्ये अंधार असल्याने लाईट नसल्याने तेथे दारू ,गांजा पिणारे मद्यपी रोज संध्याकाळी स्टेडियम मध्ये बसलेले असतात. स्टेडियममध्ये बसणाऱ्या मद्यपी मुळे मैदानावर येणाऱ्या जेष्ठ नागरिक- महीलाना व खेळाडू खुप नाहक त्रास होत आहे.
या मैदानात रोज संध्याकाळी मद्यपी बसलेले असतात. त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. परिसरात असलेल्या यशवंतराव चव्हाण स्टेडियम मध्ये रोज संध्याकाळी मद्यपींचा अड्डा असतो. स्टेडियम वर लाईट नसल्याने अंधार असतो.













