महाराष्ट्र शाहीर परिषद व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा बालशाहीर व महिला शाहीर पुरस्कार संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शाहीर परिषद व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा बालशाहीर पुरस्कार व महिला शाहिर पुरस्कार नुकताच संत तुकाराम मंदीर,संत तुकाराम नगर, पिंपरी येथे बाल शाहीर आदित्य चव्हाण ,बालशाहीर अनिकेत कांबळे,बालशाहीर कु.आदिती फिसके,महिला शाहीर सौ.संगिता आव्हाड याना उद्योजक श्री. दीनानाथ जोशी यांच्या हस्ते देण्यात आला युवाशाहीर सिद्धी कापसीकर हिने हारमोनियम वादन करून जागतीक स्तरावर नोंद केली त्या बद्दल तिची आई शाहीर शीतल कापसीकर यांना विशेष सन्मानित केले.
या प्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषदचे अध्यक्ष शाहीर प्रकाशदादा ढवळे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. नंदु कदम, संजीवनी महिला शाहिरी पथकच्या अध्यक्ष सौ. वनिता मोहिते,, श्री. हरीभाऊ कळमकर, शाहीर बाळासाहेब मालुसकर,शाहीर सुरेश सुर्यवंशी ,शाहीर नेटके,युवाशाहीर शुभम भुतकर,शाहीर राजेंद् अहेर,सौ. रजनी आहेर हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुरस्कार प्राप्त झालेल्या बाल शाहीर व महिला शाहीर यांनी पोवाडा सादर करून रसिकांची दाद मिळवली. या सर्वांना ढोलकी साठी श्री. उद्धव गुरव व हार्मोनियम साठी शाहिर नेटके यांनी साथ केली. श्री. दीनानाथ जोशी व श्री. नंदु कदम यांनी आपल्या मनोगतामधून सर्व पुरस्कार प्राप्त शाहिरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाहीर प्रकशदादा ढवळे यांनी प्रास्ताविक केले, सौ. कीर्ती मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ. वनिता मोहिते यांनी केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे संयोजन संजीवनी महिला शाहिरी पथक त्यामध्ये शाहीर प्रचिती भिषणूरकर, शाहीर लीना देशपांडे, शाहीर स्मिता बांदिवडेकर, शाहीर कांचन जोशी,शाहीर भारती फिसके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









