महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प – अभय भोर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा महाराष्ट्रातून 38 टक्के जीडीपी मिळत असून देखील अर्थसंकल्प आंध्रप्रदेश बिहार विशाखापट्टण उत्तरांचल सिक्कीम हैदराबाद राज्यांना जास्त प्राधान्य दिले अशी प्रतिक्रिया फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज चे अध्यक्ष अभय भोर यांनी दिली.
4.0 इंडस्ट्रीज कडे वाटचाल करत असताना 2.0 जात अर्थसंकल्प. रोड रस्ते बिहारला सव्वीस हजार कोटी देशात 12 इंडस्ट्रियल हब परंतु महाराष्ट्राला प्राधान्य नाही . उद्योगात होत असलेले परिवर्तन पाहता औद्योगिक वाढ ही 15% टक्के पटीने वाढणे गरजेचे आहे सध्या साडेनऊ % आहे तंत्रशिक्षण आणि खेळते भांडवल यावर योजना जाहीर होणे महत्त्वाचे होते महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते.
त्यामानाने मूलभूत सुविधांसाठी राखीव निधी देणे गरजेचे होते जीएसटी स्लॅब मध्ये कोणताही बदल दिसून येत नाही स्टार्टअप उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे होते स्टार्टअप उद्योगांना जुन्याच योजना आहेत .
महाराष्ट्राची 38% गुंतवणूक केंद्रशासनाला जाते त्या तुलनेत महाराष्ट्राला जास्त सुविधा मिळणे आवश्यक होते.. उद्योगात होत असलेले परिवर्तन पाहता औद्योगिक वाढ ही १५ टक्क्यांच्या अनुपातात वाढ
होणे गरजेचे आहे. सध्या ही साडे नऊ टक्के आहे.
तंत्रशिक्षण आणि खेळते भांडवल यावर योजना जाहीर होणे महत्त्वाचे होते.













