महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत रॅली

भोसरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात आज सकाळी रँलीस सुरवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात माझे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी माझे खुप आत्मयतीने औक्षण केले. युवक-युवतींनी केलेली पुष्पवृष्टि मला भारावून टाकणारी होती. यावेळी मोठ्या उत्साहात “अबकी बार चारसो पार”, घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार माझे स्वागत केले.
यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल भोसले, अमित भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेवक गीता ताई मंचरकर, शहर उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संयोजक विजय फुगे, रवींद्र नांदुरकर, फारुख भाई इनामदार आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले.















