महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मिनरल पाण्याचे वाटपाचे उद्घाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मानवंदना देत पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या अनुयायींना मोफत बंद बाटलीतील मिनरल पाण्याचे वाटपाचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, पोलीस हवालदार पांडुरंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, यांचे विशेष कौतुक केले सुमारे पाच हजाराहून अधिक पिण्याच्या पाण्याचे बाटलीचे वाटप मुख्य संयोजक ख्वाजा हुसेन कुरेशी, बाबू कुरेशी, सतीश गोडेराव, महाराज तुकाराम सूर्यवंशी ,,गुलाम जिलानी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार आदींनी पिण्याच्या पाण्याचे बंद बाटलीतील मिनरल पाण्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले . शैकडो अनुयायींनी या वेळी मुस्लिम बांधवांचे आभार मानले.













