महापालिकेचा ‘सुधारित सेवा प्रवेश नियम’ संकेतस्थळावर उपलब्ध करा -शिव-फुले-शाहू- आंबेडकर विचार कर्मचारी मंचाची प्रशासनाकडे मागणी

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा प्रवेश नियम पाहण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, नेहमीच सेवा प्रवेश नियमामध्ये कर्मचारी वर्गावर अन्याय केला जात आहे. जर सेवा प्रवेश नियम हा कर्मचारी वर्गाच्या हितासाठी केला जात असेल तर तो कर्मचारी वर्गांना पाहण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकावा अशी मागणी शिव-फुले-शाहू- आंबेडकर विचार कर्मचारी मंचाचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे एका केला आहे.यावेळी लिपीक संवर्ग हक्क परिषदेचे सरचिटणीस परशुराम कदम,प्रसिद्धी प्रमुख संजय घुले तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सेवा प्रवेश नियम (२०२०) शासनामार्फत मंजूर झालेला आहे. त्याची अमंलबजावणी १८/०२/२०२० पासून महापालिकेमध्ये करण्यात येत आहे. परंतु या सेवा प्रवेश नियमामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कर्मचा-यांच्या निदर्शनास आले आहे.यावर
सामान्य प्रशासना विभागामार्फत पुनश्च दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या आहेत. पन त्या केलेल्या दुरुस्त्या कशा केल्या आहेत की आहे त्याच ठेवलेल्या आहेत का ? या बाबत कर्मचारी वर्गा मध्ये चितेंचे वातावरण आहे. मागील वेळीसुध्दा सेवाप्रवेश नियम अंतिम केल्या नंतर सर्व संवर्गातील कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून दिलेला नव्हता. त्यामुळे पुन्हा ते दुरूस्त करावा लागला व कर्मचारी वर्गाचे आतेनात नुकसान झाले. त्यामुळे पुन्श्च दुरूस्त केलेला सेवा प्रवेश नियमावरून पुन्हा सर्व कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे सुधारित सेवा प्रवेश नियम शासनास अंतिम मंजूरीस पाठविण्याअगोदर महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करुन त्यावर हरकती मागाव्यात. त्यानंतरच सेवा प्रवेश नियम अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात यावा. त्यामुळे भविष्यात कर्मचारी वर्गाच्या तक्रारी राहणार नाहीत, असे संजय जगदाळे यांनी म्हटले आहे.
आमच्या पोटावर लाथ मारू नका
सेवा प्रवेश नियम म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कष्टकरी चार व तीन वर्गाचे एक प्रकारे पोटच आहे. यात अन्यायकारक अटी शर्ती लादल्यास त्याचा थेट परिणाम हा कर्मचारी वर्गाच्या पदोन्नत्या,आश्वासित प्रगती लाभावर व पगारावर होतो हे आम्ही मागील सेवा प्रवेश नियमावरून अनुभवले आहे. सध्याची महागाई पाहता वर्ग 4 व 3 च्या कर्मचारी वर्गाला आर्थिक नुकसान परवडनारे नाही. बहुतांशी कर्मचारी वर्गाचे पोट हे याच नौकरी वरच अवलंबून आहे.त्यामुळे चुकीच्या पध्दतीने सेवा प्रवेश नियम बनविल्यास जसा 2020 चा बनवला गेला व अनेकांना अनेक लाभापासून मुकावे लागले . तसे आताही हेऊ नये यासाठी शासनाकडे महापालिकेचा सेवा प्रवेश नियम पाठवण्या आगोदर तो महापालिकेच्याच संकेतस्थळावर सर्वांना पाहण्यासाठी टाकण्यात यावा ही आमची रास्त मागणी आहे.
संजय जगदाळे, अध्यक्ष-शिव-फुले-शाहू- आंबेडकर विचार कर्मचारी मंच.









