महात्मा जोतीराव फुले स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानावर महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. .
२८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून सकाळी.१०.४५ वाजता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सकाळी ११.१५ वाजता महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित “मी जोतीराव फुले बोलतोय” हा एकपात्री नाट्य प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेते कुमार आहेर हे सादर करणार आहेत.
दुपारी १२. वाजता महात्मा फुले यांच्या जीवनावर आधरित गीता गायनाचा कार्यक्रम शाहीर सुदेश कांबळे आणि सुप्रसिद्ध गायिका साधना मेश्राम यांच्याद्वारे सादर केले जाणार आहे.
“सलाम क्रांतीसुर्याला” हा महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम बाळासाहेब निकाळजे आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. दुपारी ३ वाजता गायिका आणि संगीत विशारद प्रज्ञा इंगळे यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात उर्दू-हिंदी-मराठी कविता व गझलांची प्रबोधनात्मक मैफिल “काव्य शायराना” हा कार्यक्रम होणार असून यामध्ये सिनेलेखाक व गीतकार तन्वीर गाजी, सिनेगीतकार विनायक पवार, सिनेगीतकार सतलज राहत इंदोरी, सिनेगीतकार प्रणय सतलज, वंदना सिद्धार्थ, रमेश बुरबुरे आदी मान्यवर सहभगी होणार आहेत. या कार्यक्रमाची सांगता सुप्रसिध्द लोकगायक मनोजराजा गोसावी यांच्या प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमाने होणार आहे.
या कार्यक्रमस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले आहे.













