ताज्या घडामोडीपिंपरी
मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे साहित्य पुरस्कार शानदार सोहळ्यात प्रदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेतर्फे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात, कादंबरी, कथा, कविता, ललित आणि बालसाहित्य या पाच विभागात महाराष्ट्रातून १८ पुरस्कार विजेत्यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषद – शान्ता शेळके सभागृह, प्राधिकरण निगडी येथे झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ञ डॉ. न. म जोशी, ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे रविंद्र पाटील, विवेक मोहिले, रजनी दुवेदी, संभाजी बारणे, नंदकुमार मुरडे, सुनंदा शिंगनाथ आदी पुरस्कर्ते उपस्थित होते.
या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या २४० पुस्तकांपैकी निवड झालेल्या १८ पुस्तकांच्या लेखकांना उत्कृष्ट , लक्षवेधी, व उल्लेखनीय पुरस्काराने रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार मिळालेले लेखक व साहित्यकृती मध्ये
कादंबरी विभागात:
डॉ. राजश्री पाटील कोल्हापूर ( आणि चांदणे उन्हात हसले), कृष्णकांत चेके ,पुणे (अमृताहूनी गोड), नितीन सुतार पुणे,( विधिलिखित),
कथा विभागात :
दीपक तांबोळी जळगाव ( वाटणी), जयश्री देशकुळकर्णी पुणे( दृष्टिकोन सकारात्मक विचारांचा),
लक्ष्मण दिवटे बीड ( उसवण)
ललित विभागात:
सुजाता राऊत ठाणे( मातीत मिसळण्याची गोष्ट), बालाजी इंगळे धाराशिव( मुरडण), डॉ. सुनंदा शेळके कोल्हापूर ( प्रतिभेच्या पारंब्या)
कविता विभागात:
देवेंद्र जोशी यवतमाळ( ही वाट वेगळी) निरुपमा महाजन पुणे( शांत गहिऱ्या तळाशी), डॉ. राजेंद्र झुंजारारव पुणे( झुळूक), मानसी चिटणीस पुणे ( माझ्यातील बुद्धाचा शोध)
बालसाहित्य विभागात:
डॉ. सुरेश सावंत नांदेड ( आभाळमाया), संजीवनी बोकील पुणे ( त्यांना उडू द्या) , सविता करंजकर धाराशिव (फ्रूटी कोणाची), गणेश भाकरे सावनेर( ताई माझी आई), प्रमोद नारायणे वर्धा ( म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे) या लेखकांना त्यांच्या साहित्यकृती साठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. न. म. जोशी म्हणाले की लिखाणात ताकत असावी लागते, उत्कंठा असावी लागते. यासाठी लेखकाला साधना करणे गरजेचे असते. पुरस्कार हे सफल साधनेचे दुसरे रूप होय. देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करून पुरस्कार्थीचे अभिनंदन केले.
कु. मनावा देशपांडे हिने स्वागतगीत म्हटले. राजन लाखे यांनी पुरस्कारांमागची पार्श्वभूमी सांगितली. श्रीखंडे, किरण जोशी, नागेश गव्हाड, श्रीकांत जोशी यांनी संयोजन केले. संजय जगताप व किरण लाखे यांनी सूत्रसंचालन केले. विनिता ऐनापुरे यांनी आभार मानले.













