मराठा योद्धा जिंकला ; मनाेज जरांगेंच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला. रात्री उशिरा सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या. सरकारच्या अध्यादेशानंतर मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाजाकडून जल्लोष केला जात आहे. मोठ्या संघर्षानंतर जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी आणण्यात आले असून, यातून फुलांची उधळण होणार आहे. या ठिकाणच्या एपीएमसी मार्केटमध्येच मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे काल त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती सर्व मराठा समाजासमोर मांडणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री स्वत:हा उपोषणस्थळी येउन जरांगेंचे उपोषण सोडवणार आहेत.
दरम्यान सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या माण्य केल्याने एपीएमसी मार्केटच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी ७ किंवा ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आली आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.













