ताज्या घडामोडीपिंपरी

मयुर जाधव युवा प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूरभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मयूर जाधव युवा प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबीर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पहिल्या दिवशी दापोडी येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख उपस्थिती तुषारभाऊ नवले, जन्नतताई सय्यद, मेहबूब शेख, अजयभाऊ कांबळे, शाहनवाजभाई शेख, सचिन खोकर, हभप बोधेकाका, विनायक हुलावळे, बाळासाहेब फुले, विशाल भुजबळ, प्रमोद वाघमारे, निशांत म्हेत्रे, योगेश जाधव, सुनील कांबळे उपस्थित होते.

क्रिस्टल आय केअर आणि ओंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून भव्य महाआरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने दापोडी येथील शिबिरामध्ये नागरिकांना शुगर, रक्तदाब, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारावर तपासणी व मोफत औषधं वाटप करण्यात आले. तसेच नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थाने नागरिकांना मदत होईल या भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जवळपास दोन हजार आठशे (२८००) नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यातील ८०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि ४६३ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यातील साठ रुग्णांना पुढील उपचारासाठी व चाचण्याकरिता येत्या काही दिवसांत…. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल आणि योग्य ते उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रीया करण्यात येतील असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव, हॉस्पिटलचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, मयूर जाधव युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभेल.
आगामी काळात नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असेही मयूर जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
mr Marathi