Spread the love

मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- अहमदनगर शहराचं नाव अहिल्यानगर करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचसोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नावही राजगड करण्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं त्यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version