भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलच्यावतीने सुरक्षितता सप्ताह आयोजन

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथे डायनोमर्क कंट्रोलच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षितता सप्ताह आयोजन करण्यात आले होते.
4 मार्च ते 11 मार्च या कालावधीमध्ये जगभर सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात येतो.सुरक्षितता हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून जन्मापासून मरेपर्यंत सुरक्षितता मानवी जीवनामध्ये सावली सारखा सोबत असतो म्हणून आज सुरक्षितता स्वतःच्या पहिल्या दिवशी सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सामूहिक रित्या सुरक्षिततेची शपथ देऊन सुरक्षिततेबद्दलची जाण कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण सुरक्षितता सप्ताहाच्या कालावधीमध्ये दररोज सकाळी विविध विभाग प्रमुखाच्या माध्यमातून सुरक्षितता विषयाची जाणीव कर्मचाऱ्यांमध्ये करून देण्याचा प्रयत्न आहे. हा उद्योग जगभरात काम करत असून ग्राहकाच्या समाधानापर्यंत काम करताना सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही सर्वांची सांघिक जबाबदारी आहे असे मार्गदर्शन करताना मानव संसाधन विभागाचे प्रमुख उपाध्यक्ष सूर्यकांत मुळे यांनी म्हटले आहे तर कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योगातील ज्येष्ठ कर्मचारी श्री जयंत राऊत यांनी केले.सर्व कामगार व आधिकारी यांना शपथ देण्याचे काम उद्योगातील सुरक्षा सप्ताहाचे संयोजक श्रीकांत जोगदंड यांनी पूर्ण केले. सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे व्यवस्थापकीय संचालक किशोरजी राऊत यांना कळविण्यात आले त्यांनी सांगितले कि आमच्या आस्थापनेतील विविध उपक्रमाचे नेहमीच औद्योगिक परिसरात कौतुक केले जाते .या सुरक्षा सप्ताह निमित्ताने सुरक्षिततेच्या विषयावर स्लोगण,सुरक्षितेसंबधी माहितीची कामगारा मध्ये स्पर्धा घेऊन शेवटच्या दिवशी सहभागी होणाऱ्या कामगारांना सन्मान करून रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.या यशस्वी कार्यक्रमाचे कौतुक व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अभ्यंकर यांनी केले आहे.
यावेळी मानव संसाधन प्रमुख सुर्यकांत मुळे, मुख्य कार्यकारी आधिकारी प्रकाश अभ्यंकर,विभाग प्रमुख हेमंत नेमाडे, अमोल पाटे,गुणवंत कामगार श्रीकांत जोगदंड,राजेश वैद्य,पुनम फालके,विनायक शेरकर जयश्री बोरसे,,रोहित चिंचसुरेजयंत राऊत,अमोल गोवरदिपे ईत्यादी उपस्थित होते.













